धर्मासारख्या नाजूक बाबींवर बोलताना काळजीपूर्वक बोलले पाहिजे. पण ही पथ्ये पुरोगामी मंडळींना सांभाळता आली नाहीत
आपली बांधीलकी लोकांशी असण्यापेक्षा स्वतःच्या वैचारिक कोषाशी, ‘बुद्धिवादी’ या आत्मप्रतिमेशी अधिक आहे, असे वाटावे इतकी जणू त्यांनी खबरदारीच घेतली होती. तात्पर्य हे की, त्यांची हिंदू धर्मावरील टीका आंतरिक असली तरी त्यांनी घेतलेल्या विशिष्ट पवित्र्यामुळे ती बाहेरून केली गेलेली टीका आहे, असे वाटत राहिले व तिचा फारसा उपयोग झाला नाही.......